बंजारा गोरमाटी में आपका स्वागत है | सम्पादक -डॉ.सुनील जाधव, नांदेड [ महाराष्ट्र ] | आपके विज्ञापन आमंत्रित है |

बंजारा गोरमाटी

?????? ???????

बंजारा समाज,संकृति,साहित्य का अंतर्राष्ट्रीय मंच

?????? ????,??????,??????? ?? ?????????????? ???

शुक्रवार, 20 अप्रैल 2018

भटक्या-विमुक्तांचा अस्तित्वाचा शोध - इंदल जाधव युवा संशोधक



वाडी, वस्ती, तांडा,पाल,रानावनात 
डोंगरदऱ्यात  वास्तव्य करून राहण्याऱ्या  आणि सर्व दृष्टीने मागास असनाऱ्या  विमुक्त भटक्यांना याच भूमीचे पुत्र   असूनही    घटनात्मक स्थान मिळाले नाही. अजूनही भटक्या विमुक्त जाती जमाती महाराष्ट्रात केंद्राच्या सोयी- सवलतींना पात्र नाहीत. यासाठी आतापर्यंत आठ आयोग नेमूनही भटक्या विमुक्तांच्या स्थितीत फरक पडला नाही. आजही ५४ टक्के भटके विमुक्त पालात राहतात. हे चित्र कधी बदलणार.......?
...........................................................................
प्रस्तावना :-
       भारताची सर्वात सभ्य आणि प्राचीन संस्कृती सिंधु संस्कुती मानली जाते. या संस्कृतीशी विमूक्त -भटक्यांचा इतिहास जोडलेला आहे असे मानण्यास हरकत नाही. आर्य भारतात येण्याच्या अगोदरपासून  विमुक्त-भटक्या  जाती जमाती भारतात राहत होत्या. मात्र  तेव्हा त्या जाती जमाती  विमुक्त -भटके  म्हणून ओळखल्या जात नव्हत्या  कारण भारतात त्या जाती –जमाती स्थाही जीवन जगत होत्या.  तेंव्हा शिंधू संस्कृती वैभव व समृद्धीच्या शिखरावर होती. या वेळेस सिंधु संस्कृतीच्या उत्तरार्धात ई.स.पू. १५०० वर्षापूर्वी आर्यांनी भारतात प्रवेश केला. आणि हिंसक वृत्तीच्या आर्यांनी भारतातील स्थानिक लोकांना तत्काळ जिकून गुलामी पत्कारण्यास भाग पाडले. ज्यांना गुलामी मान्य होती ते तिथेच गावातच राहिले आणि  ज्यांना नको होती त्या लोकांनी रानावनात, डोंगरदऱ्यात आश्रय घेतला. व गावाबाहेर राहून भटकंती स्वीकारली. ते भटके झाले तेव्हा पासून भटका हा शब्द प्रचलित झाला. या भटक्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली. समाज व्यवस्था आणि संस्कृती देखील बदलून गेली. असा आशय अरुण चव्हाण यांच्या पी. एच. डी. च्या शोध ग्रंथात दिसून येतो.
        आज भटका-विमुक्त असणारा समाज हा सिंधू संस्कृतीत सुखमय जीवन जगत होता. याची माहिती हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे झालेल्या उत्खनन कार्यातून जगाला प्राप्त झाली आहे. म्हणजे आर्य पूर्व काळात एक नागरी जीवन जगणारी संकृती नांदत होती असे दिसून येते. यावरून असे लक्ष्यात येते कि आज भटका असणारा समाज हा मुळचा भटका नसून तो भटका बनवला गेला आहे. आणि तो आजतागायत भटकतच आहे त्यामुळे हा समाज त्यांच्या मुलभूत अधिकारापासून आजही वंचित  आहे.  आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण झाले तरीही या भटक्या  - विमुक्त जाती जमातीच्या आर्थिक परीस्थितीत सुधारणा झालेली दिसून येत नाही आजही या जमाती निकृष्ट जीवन जगत आहे. १८७१,चा गुन्हेगारी जमत कायदा व इतर कायदे बंजारा समाजाच्या व विशेषत भटक्या समाजाच्या इतिहासाचा मुख्य अडसर होते असे मानावे लागेल. जगाच्या पाठीवर १८७१,१९११,१९२४,तथा १९५२ अर्थात ८१ वर्ष एखाद्या जमातीची अर्थव्यवस्था आत्मनिर्भरता मोडकळीस आणण्यासाठी गुन्हेगारी जमात कायदा लादून त्या समाजाचे सर्वस्व विनाशाच्या खाईत लोटणारा कायदा जगाच्या पाठीवर आढळून येत नाही. ज्या कायद्याचे अधिराज्य विमुक्त जाती भटक्या जमातीच्या मानगुटीवर लादले जाते.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि,' आदिवासी जमाती आणि गुन्हेगार जमाती यांना रानटी अवस्थेत ठेवण्यात आले. हिंदू धर्मातील प्रथा, चालीरीतीमुळे या जमातींना आपले जीवनमान उंचावता आले नाही त्यांना ज्ञानाची समृद्धी मिळू दिली नाही. या जातीतील लोकांना गुन्हे, दरोडे, चोरी करण्यापासून हिंदुनी रोखले नाही. चागला मार्ग त्यांना दाखविला नाही, कारण हिंदू धर्मात या जातीचा स्पर्श 'विटाळ' मनाला जात. त्यामुळे अशा खालच्या जमातींना ते स्पर्शही करीत नव्हते. त्यांना रानटी अवस्थेत ठेवण्यात आले. त्यामुळे अशा जमातीचा विकास खंडित झाल्याने अविकसित समाज उद्यास आला. (डॉ. बी. आर. आंबेडकर,' रायटिंग्ज अँड स्पीचेस, व्हालूम -३ पृ. ९१-९२.)   
    देशात ६६६ भटक्या व विमुक्त जाती आहेत, तर ५४० जाती अत्यंत मागास आहे काही विमुक्त जातीकडे जामिनीचे तुकडे आहेत. व झोपडीवजा घरे आहेत. तर काही वि.जा. भ.ज, ना शेतीवाडी नाही. घरदार नाही, काही वि.जा. ना पारंपारिक व्यवसाय आहेत तर काहिंना आजही एक ठराविक व्यवसाय नाही. उदरनिर्वाह व आपला गुजारा करण्यासाठी ह्या जमातींना खुप कसरत करावी लागते आणि ह्या जमाती सतत भटकत असल्यामुळे यांचा संसार उघड्यावरच असतो. यामध्ये,लोहार,बंजारा डोबारी,गोसावी,चित्रकती, कुंभार,बहुरुपी,बेस्तर,भामटा,वैसकाळी,कटाबू,वैदु,सुतार,धोबी,माळी,साळी,कोळी,आगारी,शिंपी,गोवारी,कोल्हाटी,भराडी,भुते,गारुडी,नंदीवाले,मरीआईवाले,कैकाडी,मसानजोगी,माकडवाले,वडार,वाघरी,कोष्टीबेरड,छप्परबंद   पांगुळ, रावळ, सिक्कलगर, वगळले, वासुदेव,भोई,ठेलारी,ओतारी, रामोशी, गारोडी, गोंधळी, ई.चा  समावेश होतो. खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे वि.जा. व भटक्या जमाती  आपल्या आवश्यक गरजाही पुर्ण करु शकत नाही. त्यामुळे ह्या जमातीचे अस्तीत्व धोक्यात आहे.

भटके विमुक्त म्हणजे काय ? :
           भटक्या जमाती साठी इंग्रजीत 'Nomadic Tribes’ तर विमुक्त जमातीकरिता ‘Denotified Tribes’  असे शब्द प्राचलीत आहेत. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भटक्या विमुक्तांना Aboriginal Tribes म्हणजे या भूमीचे मूळ भूमिपुत्र असे गौरवाने संबोधले आहे. इंग्रजी नवनीत डिक्सनरीमध्ये’भटक्या करिता ‘Nomad’ हा शब्द योजला असून त्याचा अर्थ ‘Member of wandering tribeम्हणजे भटके जीवन जगणारा,भटकणारा असा नमूद केला आहे.
भटक्या विमुक्त  जमाती :-                                                                    
       भटक्या विमुक्त जमाती म्हणजे उदरनिर्वाहाकरिता निवडलेल्या आगर वाट्यास आलेल्या व्यवसायानिमित्त अगर उदरनिर्वाहाच्या साधनांच्या शोधार्थ भटकत राहणाऱ्या समाज गटांना भटक्या जमाती असे म्हणता येईल.
विमुक्त जाती :-
        विमुक्त जाती म्हणजे परिस्थितीच्या किवा आर्थिक विपन्नावस्थेमुळे काही भटक्या जमाती गुन्हेगारीकडे वळल्या.त्यांना गुन्हेगार जमाती म्हणून ओळखलेले जाते. इंग्रज राजवटीत १८७१,१९२४,हे गुन्हेगार जमाती कायदे या जमातीवर लादले गेले होते. त्यामध्ये पुर्वजांचे वंशजही गुन्हेगार ठरविण्यात आले होते. नंतर हे कायदे राद्ध करून  या जमातींना विशेष मुक्त म्हणून सोडून देण्यात आले त्यामुळे या जमातींना विमुक्त म्हटले जाते.

भटके  – विमुतक्तांसंबंधी विद्वानांची मते :-
नरेंद्र गोपालराव यांच्या मते: – “ The term nomadic groups should be applied to those cultured or ethnic groups or large segments there of who are traditionally nomadic and to nomadism by their economic pattern rooted in their culture”
बाळकृष्ण रेणके यांच्या मते :-  The term nomad is with reference to animal breeding: Nomads are animals breeders, and move with their animals in search of pasture.”
प्रा. मोतीराज राठोड: –“ ज्याला गाव  शिवार नही,जो कायम पोटासाठी गावोगाव भटकतो तो भटका”  

आम्ही भटके - विमुक्त नव्हे! आदिवासीच ! –प्रा. मोतीराज राठोड 
         भटक्या विमुक्तांचे जेष्ट साहित्यिक प्रा.मोतीराज राठोड यांच्यासी भटक्या-विमुक्तांविषयी संवाद सादला असता त्यांच्याशी सहज झालेल्या गप्पा गोष्टीतून त्यांचे व्यक्त झालेले सब्द इथे माडण्याचा प्रयत्न केलेला आहे .  
भटक्या-विमुक्तांच्या संदर्भात मुळात त्यांचं संबोधनच चुकीचं तयार झालं आहे. खरं पाहिलं तर ते 'आदिम जमाती' किंवा 'आदिवासी जमाती' असं असायला हवं होतं. : “५”  याची पार्श्वभूमी अशी, की ज्या काळात इंग्रज भारतातलं एक एक राज्य, प्रांत आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते, त्या काळात जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमाती, म्हणजे रामोशी, भिल्ल, वडार, बंजारा अशा डोंगरामध्ये राहणाऱ्या जातींनी इंग्रजांना पहिल्यांदा विरोध केला. त्यामुळे इंग्रजांची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली. त्या वेळचे इतर राजेमहाराजे इंग्रजांना शरण येऊन त्यांच्याकडून पेन्शन वगैरे घेत होते. पण तंट्या भिल्ल असेल, गोविंदगीर बंजारा, उमाजी नाईक, बिरसा मुंडा ही आदिवासी माणसं कधी इंग्रजांना शरण गेली नाहीत. दहा गावं, पंधरा गावं, वीसं गावं एवढीच त्यांची पारंपरिक राज्यं होती. हे आदिवासी लोक शरण येत नाहीत, अचानक हल्ला करतात आणि आपल्याला बेजार करतात, त्यामुळे या जातींचा कायमचा बंदोबस्त आपण केला पाहिजे असं इंग्रजांना वाटू लागलं. १८१८ पासून १८५० पर्यंतच्या काळात या लोकांनी इंग्रजांना बरंच छळलं होतं.  म्हणून त्या काळात पेंढारी आणि ठग या विशेषतः उत्तर भारतात राहणाऱ्या वर्गाचा बंदोबस्त करण्याकरता इंग्रजांनी क्रिमिनल ट्राइब्ज अॅक्ट असा एक कायदा १८७१ साली केला. या कायद्याच्या नावातच ट्राईब्ज म्हणजे जमाती असा उल्लेख होता. त्यात त्या वेळच्या २७२ आदिवासी जमातींना त्यामुळे गुन्हेगार कायदा पहिल्यांदा लागू झाला.या भटक्या-विमुक्तांचे गाडे अभ्यासक व साहित्यिक म्हणून प्रा.मोतीराज राठोड यांची मते महत्वाची आहेत असे मला वाटते.

भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी कर्मवीर दादा इदाते यांचे प्रयत्न :-

     केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जानेवारी २०१५ रोजी कर्मवीर दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय भटके विमुक्त आयोगाची वर्षांकारिता स्थापना केली होती. या आयोगाने आपला केंद्रीय अहवाल जानेवारी २०१८ रोजी केंद्र सरकारकडे सोपविला असून आयोगाने 36 राज्ये केंद्रशासित प्रदेशांचाही दौरा करून या जमातींबाबतची माहिती गोळा केली.५७१ विमुक्त जाती१०६२ भटक्या जमाती २५ अर्धभटक्या जमातींची नोंद आयोगाने केली आहे. आयोगाने सादर केलेला अहवाल तात्काळ केंद्र सरकारने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करुन गेल्या ७० वर्षांपासून आरोग्यशिक्षणनिवारा या मूलभूत गरजांपासून वंचित जीवन जगणा-या या समूहास न्याय देण्यात यावा  पिढ्यान्पिढ्या भारतात राहणाऱ्यापण स्वातंत्र्याला 70 वर्षे उलटूनही "ना घर का ना घाट काअशी स्थिती झालेल्या 14 कोटी भटक्या विमुक्तांना घटनात्मक संरक्षण देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग नेमावा त्यांची राज्यवार नोंदणी करून अनुसूचित जाती-जमातींप्रमाणेच त्यांना हक्क मिळावेत अशी जोरदार शिफारस राष्ट्रीय भटके-विमुक्त आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. आयोगाचे अध्यक्ष भिकूजी दादा इदाते यांनी याबाबतचा अहवाल समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांच्याकडे दिला. आपल्या 264 पानी मुख्य अहवालात  381 पानांच्या पुरवणी अहवालात  20  ठळक शिफारशी या आयोगाने केल्या आहेत. 

भटक्या विमुक्तांना घटनात्मक संरक्षण मिळणे आवश्यक  :-
             एकेकाळी देशाच्या स्वतंत्र्यासाठी देश हित व संस्कृती रक्षणासाठी लढणाऱ्या भटक्या-विमुक्त जाती जमाती स्वतंत्र्य मिळाल्यापासुन आपल्या न्याय हक्कापासून दूर आहे. घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारानुसार अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार या पासुन या जमाती आजही वंचित आहे. भारतात भटके विमुक्तांच्या अनेक प्रमुख जाती- जमाती असून, महाराष्ट्रात त्यातील 104 जाती- जमाती असल्याचे आढळते.विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी २० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही भटक्या आणि विमुक्त समाजाची आहे. अजूनही या जमातींची निश्चित नोद शासनाकडे नसल्या मुळे त्यांची खरी आकडेवारी मिळत नही.  शासन   आर्थिक दृष्ट्या मागास, आदिवासी, विमुक्त भटक्या जमातीच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे अनेक योजना शासकीय स्थरावर राबविल्या जात आहेत. परंतु त्याचा योग्य असा फायदा आजही विमुक्त भटक्या जमातींना झालेला दिसून येत नही.मराठवाडा आणि विदर्भाच्या ग्रामीण भागात आजही विमुक्त – भटके निक्रुष्ट जीवन जगत आहे. भारत स्वातंत्र्याला सत्तर आज वर्ष उलटूनही या जमातींचा विकास झालेला नही. महाराष्ट्रच असा देशातील एकमेव प्रांत आहे , कि ज्याने आपल्या अधिकारात भटक्या- विमुकातांची स्वतंत्र सूची तयार करून आपल्या  अधिकारात स्वतंत्र सवलती जाहीर केल्या आणि विशेषत:भटक्या वर्गामध्ये एकएक नवीन जागृत जातीचा समावेश करून मुळ भटक्या- विमुकातांना सवलतींपासून वंचित ठेवण्यात आले. त्या मुले आज या जाती जमाती विकापासून कोसो दुर आहेत.आज त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अथवा येण्यासाठी घटनात्मक संरक्षण मिळणे आवश्यक गरजेचे आहे
     शिफारशी   :-
1)   भटक्‍या विमुक्तांसाठी देशात कायमस्वरूपी आयोग नेमावा, राज्यवार वेगळे आयुक्तालय असावे.
2)   एकाच जातीची वेगवेगळ्या नावांनी राज्यनिहाय नोंद झालेली आहे; ती टाळून राष्ट्रीय पातळीवर एका जातीची एकाच नावाने नोंद असावी. 
3)    विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्याथ्र्यांना मासीक शिष्यवृत्ती द्यावी.
4)   मुळ १४ विमुक्त जाती-जमातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये व मुल २८ भटक्या जमातीचा      समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात यावा.
5)   विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या विद्यार्थाला शैक्षणिक सुविधासह तांत्रीक कौशल्य तथा संशोधन कार्यासाठी विद्यापीठ स्तरावर संशोधन व प्रशिक्षण केंद्र शासनाने अनुदानीत तत्वावर उघडण्यात यावे.
6)   विमुक्त जाती भटक्या जमातींना अंदाजपत्रकात लोकसंख्येच्या प्रमाणात तरतुद करावी.
  संदर्भ :-
१)     चव्हाण अरुण (२०१३)  पि.एचडी शोध ग्रंथ पेज.न.०२
२)     (डॉ. बी. आर. आंबेडकर,' रायटिंग्ज अँड स्पीचेस, व्हालूम -३ पृ. ९१-९२.)
३)     राठोड हरिभाऊ (१०सप्टे२०१७) ऑनलाइन लोकमत  ०:२००. AM.
४)     Vedashree thigle (sept-2013) bhatkyanche sahitya page. No.03

सोमवार, 14 अप्रैल 2014

प्रा. मोतिराज राठोड जी को मिला इस साल का पहला साहित्य अकादमी पुरस्कार [पुरस्कार राशि एक लाख रुपयें ]



मराठी भाषा में [बंजारा] घुमंतू विमर्श पर आपने लेखन कार्य किया हैं |
आपने ''गोर बंजारा ईतिहास'' ,''लदेनी'', ''कबिरवाद,'''' बंजारा सन्दर्भ कोष,गुन्हेगार जाती जमाती कायदा'' , ''सिंघु संस्कृति व् पूर्व गोर बंजारा संस्कृति'' आदि मौलिक पुस्तकों द्वारा बंजारा बोली भाषा को  मान्यता दिलाई | हमे आप पर गर्व हैं | आप को लाख-लाख बधाईयाँ ....|

गुरुवार, 10 अप्रैल 2014


साप्ताहिक पढ़ने के  लिए यहाँ चटकारा लगायें  बंजारा पुकार- सम्पादक अविनाश चव्हाण 

बंजारा लेखक रावजी राठोड



आज प्रसिद्ध [बंजारा] घुमंतू विमर्श के मराठी भाषा के साहित्यकार रावजी राठोड़ के घर गया था | लगभग तीन घंटों तक कई विषयों पर हमारी चर्चा होती रही | उनका साहित्य जिया और भोग हुआ साहित्य है | उनका स्वभाव सीधा और सरल है | वे फलों से लदे झुकें पेड़ की भांति हैं | यही कारण है कि उनका साहित्य सहिरदय पाठक के मन को बरबस अपनी और आकर्षित करता है | उन्होंने उपन्यास ,कविता, समीक्षा, आत्मकथा आदि कई विषयों पर लिखा हैं | उनके साहित्य को विभिन्न स्तरीय पुरस्कारों से नवाजा गया हैं | जल्द ही उनके साहित्य का हिंदी अनुवाद हिंदी पाठकों के सम्मुख आएगा | उनकी रचनाओं के नाम इसप्रकार है - गोठन [उपन्यास],टांडेल [आत्मकथा ],मलान [कविता],मुक्तिनामा [लेख संकलन] आदि